बारामती(वार्ताहर): दि. 20 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 21 तर ग्रामीण भागातून 05 रुग्ण आणि दि.19 सप्टेंबर मधील प्रतिक्षेत असलेले 19 जणांचा अहवालापैकी सूर्यनगरी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असुन, असे मिळून 26 कोरणा बाधित रुग्ण संख्या आढळून आली आहे.
काल 118 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 20 व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून 6 व्यक्तींचे नमुने प्रतीक्षेत आहेत. इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. 43 रुग्णांची अँटीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 05 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे.
बारामतीत 2 हजार 668 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 432 आहे तर मृत्यू झालेले चौसष्ट आहे. प्रशासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम व जनता कर्फ्यू मुळे रुग्ण संख्या कमी आल्याने सर्वत्र प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.