महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ऍड.पोपटराव उर्फ आबा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. बारामती,दौंड, इंदापूर व पुरंदर या चार तालुक्यांची संघटना बांधणी करण्याची जबाबदारी आबा सूर्यवंशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

समीर थिगळे व ऍड.विनोद जावळे यांना जिल्हा संघटक करण्यात आले. 31 जुलै रोजी राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाचे नेते राजेंद्र वागस्कर व ऍड.सुधीर पाटसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हातील नेमणुका केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!