बारामती(प्रतिनिधी): सध्याच्या धकाधकीच्या युगात धर्माची संकुचित व्याख्या होत असताना धर्माला धर्माच्या अत्यंत व्यापकतेकडे नेण्याचा विचार जर कोणी दिला असेल तर भगवद्गीतून दिला आहे आणि तो समाजापर्यंत पोहचविण्याचे खरे काम इस्कॉनचे गौरांगदास यांनी केले असल्याचे प्रतिपादन बा.न.प.चे मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.
बारामती नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बारामती शाखेस सामाजिक सभागृह उभारणीच्या भूमिपूजन समारंभ बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री.गुजर बोलत होते.
यावेळी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अविनाश बांदल, स्थानिक मा.नगरसेवक बाळासाहेब जाधव, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, मा.नगरसेवक सुधीर पानसरे, कै.वस्ताद बाजीराव काळे दहिहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष ऋतुराज काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे श्री.गुजर म्हणाले की, जीवनाचा सार श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला आहे. या गीतेतील काही निवडक तत्व आपल्या जीवनात अंगिकारायचे हेच इस्कॉनचे तत्वज्ञान असल्याचे ते म्हणाले.
इस्कॉनची बारामतीत स्थापना झाली त्याचा पहिला कार्यक्रम नटराजवर झाला होता. इस्कॉनमध्ये काम करणारी सर्व मंडळी उच्चशिक्षीत आहेत. इस्कॉनचे विभागीय संचालक गौरांगदास यांचे शिक्षण पाहिले तर ते बी.टेक आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या माध्यमातून क्षणाचा विलंब न लावता जागा उपलब्ध करून दिली. सर्व धर्म संस्कृती, परंपरा टिकविण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी अजितदादांचे नेतृत्व प्रयत्न करीत असतात. त्याच माध्यमातून नाभिक,मुस्लिम, जैन, भोई, ख्रिश्र्चन, चमर्ककार, ढोर, शिख इ. समाजांना विविध योजनेतून कामे केली आहेत. इस्कॉनच्या वतीने राधा-कृष्ण सभागृह नाव देणेबाबत विनंती नगरपरिषदेस गुजर यांनी केली.
महेश रोकडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सध्या कलियुग सुरू आहे. कलह द्वंद प्रत्येकाच्या मनात, कुटुंबात, व समाजात सुर आहे. यासाठी मनशांती मिळणेसाठी चांगले विचार निर्माण होण्याच्या अनुषंगाने वेगेवगळे अध्यात्मीक प्रवाह आहे त्यात इस्कॉनचे खुप मोठे काम आहे.
शहरामध्ये स्वच्छ सुंदर बारामती उपक्रम होत आहेत. शहर कायम स्वरूपी स्वच्छ राहण्यासाठी शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. आपल्या सतसंगाच्या कार्यक्रमामध्ये हरित बारामती करण्यासाठी सहभाग दर्शवून नगरपरिषदेत सहकार्य करावे असे आवाहन सहभाग घ्यावा. येणार्या काळात इस्कॉन मंदिराचा परिसर नगरपरिषद व इस्कॉनच्या माध्यमातून हरित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी ग्वाही दिली. याप्रसंगी सौ.सुनेत्रावहिनी पवार, महेश रोकडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.काटे यांनी केले. सुत्रसंचालन अनिल रूपनवर यांनी केले तर शेवटी आभार ऍड.सुनिल पाटील यांनी मानले.
बाळासाहेबांना धन्यवाद…
प्रभागातील कामाबाबत पाठपुरावा करणारा नगरसेवक म्हणजे बाळासाहेब जाधव असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले. मध्यंतरी नगरपालिकेच्या कामांबाबत पुस्तीका तयार केली त्यामध्ये सर्वाधिक कामे बाळासाहेबांनी केली. बाळसाहेबांचे चांगला दृष्टीकोन आहे. त्यांच्यामते वहिनीसाहेबांच्या हाताला यश आहे लक्ष्मी आहेत सर्व कामे तातडीने मार्गी लागले आहेत. गौरांगदास म्हणतात सत्ता, पद गौण आहे. पण आपुलकीचे नातं बांधिलकी जपण्याचे काम ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब करतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असेही ते म्हणाले.