आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमोल देवकाते

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे असे मुख्य उद्देश असणार्‍या आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमोल देवकाते यांची नियुक्ती करण्यात आली. आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक मंत्री अजित फाटके पाटील व प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या हस्ते देवकाते यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पंजाब तसेच दिल्ली या दोन राज्यात सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. हेच कार्य आपची ध्येयधोरणे पुणे जिल्ह्यातील घराघरापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आपचे नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी दिली.

देवकाते यांच्या नियुक्ती बद्दल माजी उपसभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य व महागाई हे मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. यावरती आवाज उठवून गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आपच्या माध्यमातून केला जाईल असे नियुक्ती प्रसंगी श्री.देवकाते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!