औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू : भ्रष्ट केले म्हणून त्याने मंदिर फोडले – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे

मुंबई(वतन की लकीर ऑनलाईन): औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या त्या काशिविश्र्वेश्वराला गेल्या त्या परत आल्या नाहीत. औरंगजेबाला समजले की, तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे हा राग मनात धरून त्याने मंदिर फोडले असल्याचे वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई येथे झालेल्या व्याख्यानात म्हटले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? हे सर्व पुस्तके वाचूनच हे कळते. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात तुम्ही आलात पुस्तके वाचलीत की तुम्हाला खरे काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटे असते. असेही नेमाडेंनी म्हटलं आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात सगळ्या जुन्या गोष्टी इथेच कळतात. छत्रपती शिवाजींचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. छत्रपती शिवाजींचा शेवटपर्यंत विश्वास असणारा सहकारी मदारी मेहतर होता. स्वतःच्या लोकांवर छत्रपती शिवाजींचा विश्वास नव्हता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंग ज्याने छत्रपती शिवाजींना पकडून दिले तो हिंदू होता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले आहेत मग तो हिंदू द्वेष्टा वगैरे होता कसे म्हणता येईल? सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेब होता. इतिहासा बेटिंगचं नाव असतं. पहिल्यांदा सतीची चाल औरंगजेबाने बंद केली होती.

श्री.नेमाडे पुढे म्हणाले की, मी विद्यार्थी असताना आणि एम.ए. करत असताना मुंबई विद्यापीठात मी येऊन बसत असे. मराठीत मी नापास होणार होतो म्हणून मी तो विषय सोडला आणि इंग्रजी विषय निवडला. पण मराठी भाषेविषयी मला प्रेम होते म्हणून मी येऊन बसायचो. इथे अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यावेळी मी नाटक लिहिण्याचे मनावर घेतले होते. दुसर्‍या बाजीरावावर मला नाटक लिहायचे होते. वा. सी. बेंद्रे इथेच बसत असायचे. त्यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी जायचो. काय वाचायचे त्यांचा सल्ला घ्यायचो. पेशवे दप्तर वाचा इथे खूप आहे असे त्यांनी मला सुचवले होते. त्यावेळी मी इतिहास वाचला आणि माझ्या लक्षात आले की आत्तापर्यंत जो काही इतिहास आपण वाचत आलो तो काही खरा नाही. आपण खर्‍या पद्धतीने दुसर्‍या बाजीरावावर लिहिलं पाहिजे.

दुसरा बाजीराव हा खूप मोठा माणूस होता कारण त्याने पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात दिला. पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरण द्यायचे झाले तर मी नानासाहेब पेशव्यांचे देईन. तरुणांना मी आज हे सांगू इच्छितो की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणे कठीण आहे त्यामुळे पुस्तक वाचले की सत्य कळते. असेही यावेळी नेमाडे यांनी म्हटलं आहे. नानासाहेब पेशवा कुठेही गेला की त्याचे पत्र असायचे तो कुठेही गेला की त्यांचा गोविंदपंत बुंधेले हा त्यांचा सरदार होता त्याला हे पत्र लिहून सांगायचे मी या-या दिवशी अमुक-अमुक ठिकाणी येणार आहे. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात असे पत्र आहे मी ते वाचले आहे. आठ ते दहा वर्षांच्या मुली, हा माणूस (नानासाहेब पेशवे) 40-42 वर्षांचा. हा त्या कशासाठी तयार ठेवायला सांगायचा? हा त्यांना मारायचा की अजून काही करायचा ते माहित नाही असेही ते म्हणाले.

अशा या पेशव्यांच्या तावडीतून आपण सुटलो ते फार बरं झाले असे मी बेंद्रे यांना सांगितले. तेव्हा बेंद्रे संतापले, इंग्रजांकडे महाराष्ट्र जाणे चांगले आहे का? त्यावर मी त्यांना म्हटले की आम्ही लिळाचरित्र ऐकून मोठे झालो. तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. चक्रधर स्वामी आणि तुकाराम महाराजांपेक्षा मोठे कोण आहे जगात? त्यांचा आदर्श आम्ही ठेवला. त्यामुळे खरे आहे ते आम्ही पाहिले. इंग्रज त्यांच्यामुळेच आले. पेशव्यांच्या बदमाशीमुळेच इथे आले. इंग्रजही बदमाशच होते पण आपल्यापेक्षा कमी होते असंही नेमाडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!