9 ऑगस्टला बारामतीत इंदोरीकर महाराजांचे किर्तन : श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा होणार!

बारामती(वार्ताहर): येथील श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवानिमित्त बारामतीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तनासाठी आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी सुप्रसिद्ध असणारे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे दि.9 ऑगस्ट 2023 रोजी सायं.5.30 वा. वृंदावन मंगल कार्यालय, पाटस रोड, देशमुख चौक बारामती याठिकाणी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत किर्तन होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

दि.10 ऑगस्ट रोजी सायं.7 वा. टकार कॉलनी, तांदुळवाडी वेस याठिकाणी लहान मुलांचा डान्स कार्यक्रम होणार आहे. दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. श्रींच्या मुर्तींचा अभिषेक, 9.30 वाजता श्रींच्या मुर्तीची पालखी मिरवणुक बारामती शहरातुन निघणार आहे.

दुपारी 12.30 वा. बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.प्रेमेंद्र देवकाते, स्त्रीरोगतज्ञ डॉ.विशाल मेहता व टकारी समाज संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार जाधव या मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र निगडे यांनी सांगितले आहे.

दुपारी 12.30 ते 3.00 या वेळेत भोजन तर सायं.6 ते 7 वाजता महिलांचा मंगळागौरी कार्यक्रम होणार आहे. सायं.7 वा. महाआरती, सायं.7.30 वाजता सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार, मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, सौ.भारती मुथा, मा.ज्येष्ठ नगरसेवक ऍड.सुभाष ढोले, मा.जि.प.अध्यक्ष विश्र्वास देवकाते हे उपस्थित राहणार आहेत.

रात्रौ. 8 वा श्री छत्रपती शिवाजी महाराज काव्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री.ह.भ.प.महादवे महाराज पळसदेवकर (सिंधखेडकर, जि.जालना) यांचा भारूडाचा कार्यक्रमा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे सुत्रसंचालन महेंद्र सोपान गायकवाड (सर) हे करणार आहेत.

सदर कार्यक्रमाच्या सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठविलेल्या आहेतच, मात्र नजरचुकीने कोणाला निमंत्रण मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास उपस्थित रहावे असेही आवाहन श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!