बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 103 वा जयंती महोत्सव साठे नगर कसबा भागात अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व लहुजी प्रतिष्ठान पॉंईंट यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी 11 वाजता साठेनगर या ठिकाणी पुजापाठ व अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्य, खेळणी, कपडे, स्कुल बॅग वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंडळाच्या विविध उपक्रमांचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब यांनी कौतुक केले. तसेच संध्याकाळी 6 वाजता माजी उपनगराध्यक्ष विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, लहुजी प्रतिष्ठान पॉंईट, जय लहुजी फ्रेंड सर्कल, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, लहुजी शक्ती सेना बारामती, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना बारामती, लहुजी स्वराज्य सेना, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना बारामती, सत्यशोधक बहुजन आघाडी, साठे नगर मधील विविध संघटना व संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने भव्य अशा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, दत्तात्रय सातव, मा.नगरसेवक सुरजशेठ सातव, माजी शहराध्यक्ष ऍड.सुभाष ढोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेस सुरुवात झाली.
शोभा यात्रे महीलांचा विशेष सहभाग होता याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक श्री.माळवे श्री.पाटील, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, भारतदादा अहीवळे, कुंदन लालबिगे, प्रा.रमेश मोरे, साधु बल्लाळ, विशाल जाधव, चंद्रकांत खंडाळे, दिनेश जगताप, शुभम अहिवळे, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष उमेश काळे, उपाध्यक्ष योगेश गाडेकर, पी.टी.गांधी, ऍड.बापु शिलवंत, ऍड.अमोल सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, ऍड.अमृत नेटके, ऍड.स्वप्निल खरात,अहमद तांबोळी, सागर जाधव, राहुल खरात, सनी खरात, विजय सकट, विशेष आवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधु बल्लाळ यांनी केले तर आभार ऍड.स्वप्निल खरात यांनी मानले.