बारामती(वार्ताहर): मनुवादी विचार व विकृत प्रवृत्तीच्या मनोहर कुलकर्णी (फेक नाव संभाजी भिडे) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले याबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला लेखी अर्जाद्वारे केली आहे.
यावेळी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष बिलाल बागवान, शहराध्यक्ष सुरज येवले, सुरज भोसले इ. निवेदन देतेसमयी उपस्थित होते.
मनोहर कुलकर्णी सारखे श्रीकृष्ण कुलकर्णींचे वंशज (अफजल खानाचे वकील) यांनी आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणे म्हणजे बहुजन समाजावर मनुवादी विचारांचा पगडा बिंबवणे असे होईल असेही निवेदनात म्हटले आहे. भिडे यांनी तीन तास केलेल्या भाषणात शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.