बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील तसेच कामगार व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान हे अतुलनीय असुन भारत सरकारने या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न किताबाने सन्मानीत करायला हवे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर यांनी केले.
झोपडपट्टी सुरक्षा दल व मांग-गारूडी समाज यांच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री.पाटसकर बोलत होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, मा.नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे, मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नवनाथ बल्लाळ, अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव, गणेश सोनवणे, बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, नितीन शेलार, अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, तैनुर शेख, साधु बल्लाळ, सुनिल शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार खर्या अर्थाने परिवर्तनवादी असुन सर्व समाजाने त्यांचे अनुकरण केले पाहिजे. कामगार, साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्र तसेच उपेक्षित वंचित घटकाला न्याय देणारा लेखक अशाप्रकारे अण्णाभाऊंचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोच्च भारतरत्न किताबाने गौरव होणे गरजेचे आहे असेही श्री.पाटसकर म्हणाले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर, गजानन गायकवाड, सचिन सकट, अभिमन्यू लोंढे, बापू पाथरकर, शरद पाथरकर, पप्पू भाले, आनंदा लोंढे, राजू खलसे यांचे वतीने करण्यात आले होते.
यावेळी बारामती शहर पथविक्रेता समितीवर गौरव अहिवळे, दादा कांबळे यांची निवड झालेबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर एम.आय.डी.सी येथे रक्तदान शिबीर आयोजित केलेबाबत सोमनाथ गायकवाड यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.