पुणे: कराटे या खेळाने ऑलिम्पीकमध्ये पर्दापण केल्यापासून कराटे शिकण्याची व त्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. बारामती येथील शोतोकान कराटे संस्था शारीरिक आणि मानसिक शिस्त विकसित करण्यासाठी हात, पाय, कोपर आणि गुडघ्यांसह प्रहार करण्याचे तंत्र कसे वापरावे व ते कसे रोखावे, पकडावे हे प्रशिक्षण गेली तीन वर्षापासुन दिले जात आहे.
नुसतं क्लासमध्ये प्रशिक्षण देवून चालत नाही तर मुलांना सतत सराव होईल या उद्देशाने विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम बारामती शोतोकान कराटे संस्था करीत आलेली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे 23 जुलै 2023 रोजी 25 वी इनविटेशनल राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये बारामती शोतोकान कराटे च्या 19 खेळाडूंनी भाग घेतला होता.
त्यामध्ये नुपूर राजीव खरे (एक गोल्ड एक सिल्वर), श्रीनिका नितीन सातव (गोल्ड), कृष्णा किरण सातव (ब्रॉन्झ), ध्रुवा ओकार उंडे (गोल्ड), आदिती विशाल रणसिंग (एक गोल्ड, एक ब्रॉन्झ), तुळजा शैलेश तारापूरकर (दोन ब्रॉन्झ), स्वरा संजय अहिवळे (सिल्वर), अंजली रोहन शेरकर (दोन ब्रॉन्झ), श्रेयश रणजीत हाडके (एक गोल्ड, एक सिल्वर), आरुषी संतोष झांबरे (एक सिल्वर) यशोधरा परशुराम भोसले (एक सिल्वर), युगंधरा परशुराम भोसले (एक गोल्ड), आरीज तैनूर शेख (एक ब्रॉन्झ), श्रावणी अभिमान निकत (एक ब्रॉन्झ), परि संतोष काटकर (एक ब्रॉन्झ), गौरी बाप्पू भापकर (एक गोल्ड), विहान अभिजीत शिंदे (एक सिल्वर), श्रवण राऊत (एक सिल्वर), अनुष्का संतोष गिरमे (एक ब्रॉन्झ) असे एकूण 24 मेडल मिळवले.

या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक शिवानी गणेश कदम-काटे-देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तांत्रिक आणि ऍथलेटिक कामगिरीनुसार कराटेकाचे मूल्यमापन केले जाते. तोच धागा धरीत मुलांचा दैनंदिन घेतलेल्या सराव व नवनविन घेतलेल्या तंत्रामुळे गुण मिळविले असल्याचे शिवानी कदम-काटे देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.