बारामती(वार्ताहर): महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या शिबीराचे उद्घाटन भाजपाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. यावेळी वासुदेव काळे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अजित मासाळ, युवा शहराध्यक्ष विक्रम थोरात, श्रीनिवास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी उपस्थित भाजपा बारामती विधानसभेचे निवडणूक प्रमुख रंजन तावरे, भाजपा नेते अविनाश मोटे, बारामती भाजप शहराचे शहराध्यक्ष सतीश फाळके व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 319 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे सतिश फाळके यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.