बारामती(वार्ताहर): दि. 19 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 30 तर ग्रामीण भागातून 25 रुग्ण असे मिळून 55 कोरणा बाधित रुग्ण संख्या आढळून आली आहे. काल 223 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 21 व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून 19 व्यक्तींचे नमुने प्रतीक्षेत आहेत. इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. 99 रुग्णांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 34 पॉझिटिव्ह आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 55 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 2 हजार 642 रुग्ण असून, बरे झालेले 1 हजार 391 आहे तर मृत्यू झालेले 63 आहे.