विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि क्विकहील फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार : सामाजिक साक्षरतेतून विद्यार्थ्यांना मिळणार सायबर सुरक्षेचे ज्ञान

बारामती(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि क्विकहील फाउंडेशनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक साक्षरतेतून सायबर सुरक्षेचे ज्ञानाबरोबर कमवा आणि शिका या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे.

या सामंजस्य करारावर विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे तर क्विकहील फाउंडेशनच्या सीएसआर समितीने स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारातुन विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि व्यावहारिक अनुभव प्रदान होईल. शिक्षक आणि समन्वयकांसाठी प्रशिक्षण सत्रे आणि तांत्रिक मार्गदर्शन वाढवतील. दोन्ही संस्था या योजनेच्या यशस्वीतेची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहेत. क्विकहील फाउंडेशन प्रगत सायबर सुरक्षा उपायांसाठी ओळखले जाते. फाउंडेशनची सीएसआर शाखा सामाजिक सायबर सुरक्षा करण्यावर लक्ष केंद्रित करते. कमवा आणि शिका हि योजना विद्यार्थ्यांना उद्योग-विशिष्ट कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी उपयुक्त ठरेल. दोन्ही संस्था या योजनेचे सकारात्मक परिणाम पाहण्यास उत्सुक आहेत.

श्रकरारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद, गजानन जोशी, किशोर ढाणे, विभाग प्रमुख महेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या समन्वयक सलमा शेख तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून टीवायबीबीए-सीए या वर्गातील साहिल तावरे काम करणार आहे. करार यशस्वी होण्यासाठी गौतम कुदळे, विशाल शिंदे, अनिल काळोखे, पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, वैशाली पेंढारकर, कांचन खीरे, रवी जुन्नरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!