शिवसेना-भाजप युतीमुळे इंदापूरात विकास कामांना भरघोस निधी – हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): एक वर्षांपासून राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार सत्तेवर आलेपासून इंदापूर तालुक्यातील विकास कामांना भरघोस निधी मिळत आहे. आगामी काळातही जास्तीचा निधी मिळणार असल्याने, विकास कामांचा ओघ सुरूच राहणार असल्याचे माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हिंगणगाव, शेटफळ हवेली, वकीलवस्ती, तक्रारवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी श्री.पाटील बोलत होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या 4 गावांमध्ये रु. 9 कोटी 14 लाख रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनांचे कार्यक्रम उत्साही वातावरणात व कार्यकर्त्यांच्या गर्दीत संपन्न झाले. या कार्यक्रमांस गावोगावी जनतेचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा व भविष्यातील विकास कामांचा आढावा घेतला. इंदापूर तालुक्याच्या चौफेर विकासासाठी शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजने करण्यात आलेली विकास कामे पुढीलप्रमाणे:-
1) हिंगणगाव (एकूण- रु.27 लाख)- जुने गावठाण ते दत्त मंदिर रस्ता-15 लाख, दत्त मंदिर येथे नवीन गावठाण रस्ता-12 लाख. 2) शेटफळ हवेली (एकूण-रु.14 लाख)-गारपीर ते सावंत वस्ती रस्ता-7 लाख, गारपीर ते कानगुडे वस्ती रस्ता-7 लाख. 3) वकीलवस्ती (एकूण-रु.5.25 कोटी)- ग्रामपंचायत कार्यालय बांधणे-20 लाख, आनंद दूध डेअरी ते खंदारे वस्ती रस्ता-7 लाख, हनुमान नगर अंतर्गत रस्ते करणे-8 लाख, अधिवेशन मार्च 23 अर्थसंकल्पातून वकीलवस्ती-भांडगाव रस्ता-90 लाख, पावसाळी अधिवेशन जुलै 23 मधून वकीलवस्ती-भांडगाव रस्ता-रु.4 कोटी. 4) तक्रारवाडी (एकूण-रु.3.47 कोटी)-तक्रारवाडी ते गाडेश्वर मंदिर रस्ता-रु.1.20 कोटी, तक्रारवाडी राष्ट्रीय पेयजल योजना-रु.1.30 कोटी, भिगवण-राशीन रोड ते पाणी शुद्धीकरण केंद्र रस्ता-रु.65 लाख, संपत वाघ घर ते राहुल सावंत घर रस्ता- रु.7 लाख, संपत वाघ घर ते जगदाळे घर रस्ता-रु.10 लाख.

सदरच्या कार्यक्रमांना गावो-गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!