1 हजार युवकांची बाईक रॅलीचे आयोजन अजितदादा युवाशक्ती संघटनेने घेतला पुढाकार!

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजी सकाळी 11 वा. 1 हजार युवकांची बाईक रॅलीचे आयोजन अजितदादा युवाशक्ती महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे वतीने करण्यात आली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक अभिजीत भिमराव काळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस व त्यांच्या समर्थनाथ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बाईक रॅलीमध्ये बारामती शहरासह परिसरातील संघटना, संस्था, मंडळांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर अजितदादांना समर्थन स्वाक्षरी हा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे.

बाईक रॅली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय भिगवण चौकातुन प्रारंभ करण्यात येणार आहे. या आयोजनात सहभागी होणारे (प्रमुख व कंसात मंडळाचे नाव) सोमनाथ आप्पा गायकवाड (अजितदादा युथ फाउंडेशन), गजानन गायकवाड (अनंतराव पवार दहीहंडी संघ आमराई), विशाल जाधव (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर), आदित्य हिंगणे मित्रपरिवार पाटस रोड, नितीन मोहिते (ओन्ली बाबा मोहिते दहीहंडी संघ) राकेश वाल्मिकी (राकेश भैय्या वाल्मिकी मित्र परिवार), सोनू कांबळे, गणेश काका जोजारे मित्रपरिवार कसबा, ओंकार पवार (आर्मी बॉईज मित्रपरिवार), दादू किर्वे (नो फेअर ग्रुप), अभिजीत चव्हाण माजी नगरसेवक मित्रपरिवार, गणेश सोनवणे नगरसेवक मित्रपरिवार, साधू बल्लाळ (सामाजिक न्याय विभाग व मित्रपरिवार), आसिफ बागवान (राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग), संतोष अण्णा सातव मित्रपरिवार, परवेज कमरुद्दीन सय्यद (सहारा फाउंडेशन बारामती), पार्थ गालींदे मित्रपरिवार, अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, देवा देशमाने मित्रपरिवार खंडोबानगर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती, बबलू जगताप ग्रुप आमराई, भाऊ दराडे मित्रपरिवार वंजारवाडी, श्रीरंग भाऊ जमदाडे (नाथ मस्कोबा ग्रुप जळोची), सचिन काकडे (एस.के.ग्रुप आमराई), नगरसेवक मयूर लालबिगे (उघडा मारुती मंडळ), सुभाष सोमाणी मित्रपरिवार, निलेश इंगुले (युनिटी फ्रेंड ग्रुप), रविराज लाखे तावरे पाटील मित्र परिवार माळेगाव, अमित गोंडे मित्रपरिवार माळेगाव, भूषण जगताप मित्रपरिवार पणदरे, ओंकार जाधव मित्रपरिवार, अक्षय काकडे मित्रपरिवार मोरगाव, काळे बंधू बारामती, कसबा क्रिकेट क्लब इ. समावेश आहे.

अजितदादा युवाशक्ती महाराष्ट्र प्रदेश, बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अजित दादा कट्टर समर्थकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!