इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): सत्तेत दहा टक्के हिस्सा देऊ या शब्दाच्या अधिन राहुन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिलेला होता. तो शब्द त्यांनी पाळला नाही ते फक्त गोडबोले नेते असल्याची टीका बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी केली.
इंदापूर रेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार परिषदेत भोंग बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यापुढे कोणालाही पाठिंबा न देता येणार्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत.
भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. सत्तेसाठी त्यांनी ज्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ईडीची चौकशी सुरू आहे. अशांना मंत्रीपद देवू केले असल्याचे इंदापूर तालुका प्रभारी महेश लोंढे यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष राहुल शिंगाडे, बी एम पी चे कार्यकर्ते सुरज दाहिजे उपस्थित होते.