मुस्लिम व मागासवर्गीयांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मैदानात

बारामती(वार्ताहर): मुस्लिम व मागासवर्गीय समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ चॉंदशाहवली दर्गा ते प्रशासकीय भवन बारामती इथपर्यंत वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेने तर पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला होता.

परळीत मुस्लिम समाजातील जरीन खान या ज्येष्ठाला पोलीस कोठडीमध्ये केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. यामध्ये आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा. अक्षय भालेराव याला न्याय मिळावा व मातंग समाजावरील होणारे अन्याय अत्याचार थांबवावे अशा मागण्या मोर्चामध्ये मांडण्यात आल्या होत्या.

प्रशासकीय भवनाच्या गेटसमोर निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेत राज कुमार म्हणाले, मुस्लिम व मागासवर्गीय समाजावरील होणारे अन्याय अत्याचार जर थांबले नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत शासनाला धारेवर धरले.

राष्ट्रवादी व बीजेपीच्या पाठीमागे न जाता मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी केले व तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला.

यावेळी बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, शहराध्यक्ष ऍड.रियाज खान, प्रशांत कांबळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे बारामती शहराध्यक्ष अजीज सय्यद यांनी मुस्लिम समाजावरती होणार्‍या अन्याय बाबत जाहीर निषेध व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चास जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी संपर्कप्रमुख ऍड.वैभव कांबळे, विनय दामोदरे, अशोक कुचेकर, आनंद जाधव, माळेगाव शहराध्यक्ष अण्णा घोडके, उपाध्यक्ष रमेश शिंदे, मोहन कांबळे, जिल्हा संघटक सुजय रणदिवे, सिद्धांत सावंत, अखिल बागवान, तोसिफ शेख, इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे, महासचिव गौतम कांबळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे, शहराध्यक्ष सुभाष खरे, संतोष कांबळे, आदेश निकाळजे, तालुका सचिव प्रतीक चव्हाण, महासचिव सुरज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप, मंगेश सोनवणे, काकासाहेब सोनवणे, संघटक गणेश थोरात इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!