बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहिमेला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि.8 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते सायं.5 वाजेपर्यंत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर यांनी ही मोहिम राबविली.
जिल्हा उपाध्यक्ष ऍड.पोपटराव सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष ऍड.निलेश वाबळे, ऍड.भार्गव पाटसकर, प्रविण धनराळे, ऍड.सोमनाथ पाटोळे, ऍड.मेघराज नालंदे, अजय खरात, ओम पडकर इ. उपस्थित शुभारंभ करण्यात आला.
सध्याचे राजकारण रसातळाला गेले असून त्याचा चिखल झाला आहे. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी ही सह्यांची मोहिम आखण्यात आली होती. भिगवण चौकात नागरीकांनी थांबून या चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा संताप व्यक्त करत सह्या केल्या असल्याची माहिती ऍड.निलेश वाबळे यांनी दिली.