16 जुलैला रंगणार ’स्वरभक्ती’ गायनस्पर्धा!

बारामती(वार्ताहर): येथील संत सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त 16 जुलै रोजी स्वरभक्ती या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

यामध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक भक्तीगीत, गवळण, अभंग, भजन सादर करायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी कमीत कमी चार साथीदारांसोबत आपले सादरीकरण करायचे आहे. स्पर्धेसाठी पाच वेळा जास्तीत जास्त सात मिनिटे असा वेळ दिला जाणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी एकूण पाच बक्षीस देण्यात येणार आहे.

प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय 1 हजार अशी बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

’गायकांना आणि भजनी मंडळ यांना आपली कला सादर करण्यासाठी संधी मिळावी, याकरिता यावर्षीपासून मंडळाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे, तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संत सावता माळी तरुण मंडळाच्या वतीने केले आहे.

या कार्यक्रमासाठी जुलैपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क-
सागर जाधव-98819 74470
राजश्री आगम-9604398645
प्रदीप लोणकर-90565 65758

ह.भ.प. ऋषिकेश हिवरकर महाराज-7887436545 ही स्पर्धा डेंगळे गार्डन माळेगाव रोड बारामती येथे संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!