कु.निकीता खरात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेंबद्दल सत्कार!

बारामती(वार्ताहर): अतिशय खडतर परिश्रम करीत, आर्थिक परिस्थितीला दोन हात करीत गवारेफाटा (बारामती) येथील मयुरेश्र्वरी उर्फ निकीता हुनमंत खरात हीची उपनिरीक्षकपदी निवड झालेबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

फलटण रोड, गवारफाटा येथील खुशबू फर्निचरचे जावेद मंजलापुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मुनीर तांबोळी, दर्गा मशिदीचे ट्रस्टी हाजी युसूफभाई इनामदार, तैनुर शेख, मळदचे माजी सरपंच धनुभाऊ गवारे, उपसरपंच किरण गावडे, सदस्य त्रिंबक सातव इ. मान्यवर उपस्थित होते.

निकिता खरात हिचा सर्व मान्यवरांच्या उपस्थित आलताफ सय्यद यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याबरोबर तिचे आई-वडिल यांचा सुद्धा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

एवढ्या हालाकिच्या परिस्थितीत निकिताने शिक्षण पूर्ण केले याबाबत उपस्थित मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केले. तैनुर शेख, मुनीर तांबोळी, आलताफ सय्यद यांनी मनोगत व्यक्त करून निकतास शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार खुशबू फर्निचरचे मालक जावेद मंजलापुरे यांनी केला.

निकिता खरात हिने मनोगत व्यक्त करताना सर्व परिस्थिती मांडल्यावर तिच्या कुटुंबातील व्यक्तींना अश्रु अनावर झाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी केले तर शेवटी आभार जावेद मंजलापुरे यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!