इंदापूर(प्रतिनिधी: अशोक घोडके) : प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्व अनन्यसाधारण असते, त्यांचा सन्मान करणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी सैनिक व सा.लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव गाढवे यांनी केले.
बिजवडी विद्यालयात आयोजिक गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्त श्री.गाढवे बोलत होते. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास फलफले, सा.शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर, सुनिल माळी, शंकर हुबाले, चंद्रकांत काळे, कालिदास मोरे, गोरू मेंगाळ, जयश्री झगडे, वर्षा कचरे, शितल जाधव, स्वाती पडळकर, रविंद्र माने इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे गाढवे म्हणाले की, गुरूविना जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरूविना होणार नाही असेही ते म्हणाले. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती होय. भारतीय सभारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते.ंस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. पौराणिक शास्त्राचा संदर्भ देत ते म्हणाले गुरुपौर्णिमा हा महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यास व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र या वेदांची रचना केली त्यामुळे त्यांना वेद व्यास असेही म्हटले जाते. विद्यालयातील सर्व गुरूजन ज्ञानदानाचे उत्कृष्ठ असे काम करीत आहात असे म्हणून त्यांनी सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
विलासराव गाढवे व धनंजय कळमकर या दोघा संपादकांच्या वतीने सर्व गुरूजनांना भिंतीवरील घड्याळ व दिनदर्शिका भेट देण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.