बारामती(वार्ताहर): येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक शाळेत गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूशिष्यांची जोडी असलेली वेशभूषा लक्ष वेधून घेत होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.बडदे सर यांनी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.

चित्रा ताईंनी गुरु विषयी थोडक्यात माहिती सांगून खेळवाडी ते मोठा गट या प्रत्येक वर्गातील मुलांनी प्रत्येकी गुरु शिष्यांच्या जोड्या बनवल्या होत्या. उदाहरणार्थ= चांगदेव- मुक्ताबाई, शिवाजी महाराज- रामदास स्वामी, श्याम- श्यामची आई, एकलव्य-कृष्ण अर्जुन-गुरु वशिष्ठ आणि राम अशा जोड्या करून त्यांची ओळख मुलांना सांगण्यात आली. छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गुरु विषयी छान श्लोक म्हटले व माहिती सांगितली मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा हे नाटक खूप छान सादर केले.
विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचे (ताईंचे) श्रीफळ व पेन देऊन पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेच्या शाला समितीच्या सर्व पदाधिकार्यांचे बहुमोल मार्गदर्शन व शुभेच्छा मिळाल्या व त्यांनी सर्व बालमित्रांचे कौतुकही केले.