इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक गेली 5 वर्ष गैरहजर, इंदापूर गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कारवाई नाही त्यामुळे गोतंडी ग्रामपंचायतीचा रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोतमेश्वरनगर गोतंडी याठिकाणी शिक्षकीसेवा देणारे जगन्नाथ बाजीराव खरात हे गेली पाच वर्षे गैहजर आहेत. या गैरहजरीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गोतंडी ग्रामस्थांनी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केलेला असताना सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गटविकास अधिकारी हेच खरात गुरुजी यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.
या सर्व प्रकाराबद्दल गोतंडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने खरात गुरुजी यांच्या वरती योग्य ती कारवाई करून त्या ठिकाणी नवीन शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी दि.8 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंदापूर बारामती महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याची माहिती गोतंडी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी दिली आहे.