बारामती(वार्ताहर): डॉक्टर्स डे निमित्ताने बारामतीच्या डॉक्टरांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वृक्षा रोपण,रक्तदान शिबीर तसेच आयएमएच्या माजी अध्यक्ष यांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉक्टर्स डे निमित्त येथील इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या मेडीकोजगिल्ड येथे सकाळी वृक्षारोपणाचा व सायंकाळी वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ट तसेच आयएमएच्या माजी अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला तर येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ या रक्त पेढीने रक्त संकलन केले. शिबिराचे उद्घाटन आय.एम.ए. महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, जेष्ट डॉ.आर.पी.राजे, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले तर आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष डॉ.मृणालिनी जळक, सचिव डॉ. राजेंद्र कोकरे, आय एम एचे खजिनदार डॉ. दाद्साहेब वायसे, तसेच डॉ. संजय पुरंदरे, डॉ.सौरभ मुथा, डॉ.राजेंद्र मुथा, डॉ.दीपिका कोकणे, डॉ.प्रियांका आटोळे, डॉ.अविनाश आटोळे,डॉ.विक्रांत धोपाडे, डॉ.विभावरी सोळुंके, डॉ.अपर्णा काटे, डॉ.कीर्ती पवार, डॉ.प्राजक्ता पुरंदरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. तर आय.एम.ए बारामतीचे अध्यक्ष डॉ.सतीश पवार, उपाध्यक्ष मृणालिनी जळक, सचिव डॉ.राजेश कोकरे, खजिनदार डॉ.दादासाहेब वायसे तसेच ब्लड बँकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एन.धवडे यांनी उपस्थित मन्यवराचा स्वागत केले.