बारामती(वार्ताहर): राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लवकरच मंत्रीमंडळात स्थान मिळावे म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका प्रभारी ऍड.दिलीप धायगुडेपाटील यांच्या हस्ते पताकाचा मळा येथील मारुतीरायाला साकडे घालून आरती करण्यात आली.
यावेळी अवि मासाळ, अमोल जाधव, बाळासाहेब झारगड, चंद्रकांत देवकाते, बबन मारकड इ. ग्रामस्थ उपस्थित होते.
काटेवाडीतील पताकाचा ओढा येथे रस्ता, वीज, पाणी तसेच मारुती मंदिर समस्येवर राष्ट्रीय समाज पक्ष येणार्या काळात आंदोलन करणार असल्याचे ऍड.धायगुडे म्हणाले. बारामती तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्याचे बळ मिळणेकामी प्रार्थना केली.