बारामती(वार्ताहर): बारामती दूध संघाच्या चेअरमनपदी पोपटराव सोमनाथ गावडे (रा.कर्हावागज) तर व्हा.चेअरमनपदी संतोष मारुती शिंदे (रा.मूर्टी) यांची निवड करण्यात आली.
दि.03 जुलै 2023 रोजी बारामती दूध संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाच्या निवडीच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्या नावाची घोषणा केली.
याप्रसंगी संभाजी होळकर, निवडणूक अधिकारी सुधीर खांबायत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, बारामती खरेदी-विक्री संघाचे सभापती दत्तात्रय आवळे व डॉ.अनिल ढोपे आदिंसह संचालक मंडळ, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.