बारामती(वार्ताहर): शिक्षकांबरोबर आपले आई-वडिल खरे मार्गदर्शक गुरू असतात असे प्रतिपादन समीर वर्ल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी केले.
समीर वर्ल्ड स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करतेवेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या की, गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेला येत असल्यामुळे या दिवसाला आषाढ पौर्णिमा असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे महाभारत ग्रंथनिर्मितीकार व्यास मुनी यांचा जन्मदिवस म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. गुरुपौर्णिमा विविध धर्मांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती मंत्र उच्चारत प्रतिमेचे पूजनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प, वृक्षारोप भेट देत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी,मराठी, हिंदी या भाषेत मनोगत व्यक्त करीत गुरुंबद्दल आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांसाठी एक नृत्य सादर केले. यावेळी छोट्या चिमुकल्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.