इंदापूर येथील शिबिरात 162 निरंकारी भक्तांचे उत्स्फुर्त रक्तदान!

बारामती(प्रतिनिधी-अशोक कांबळे): युगप्रवर्तक गुरुबचनसिंहजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून इंदापूर येथील शिबिरात 162 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. प्रामुख्याने यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे इंदापूर शाखेचे प्रमुख शिवाजी अवचर यांनी सांगितले.

संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इंदापूर शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. 25) सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मिशनचे संयोजक यांच्यासह आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान श्री. झांबरे यांच्या उपस्थितीत विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरित संदेशाची आठवण करून देताना श्री. झांबरे म्हणाले ’रक्त धामण्यांमध्ये वहावे, नाल्यामध्ये नको’ हाच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत असल्याचे सांगितले. अशप्रकारे उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटावून देत रक्तदान का करावं या विषयी मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये बारामतीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ या रक्तपेढीने रक्त संकलन केले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांचे सहकार्य लाभले. तर सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!