बारामती(वार्ताहर): शालेय विद्यार्थ्यांना विविध संतांची माहिती व्हावी त्यांनी केलेले कार्य कसे अजरामर राहिले आहे याची प्रचिती यावी म्हणून समीर वर्ल्ड स्कूलमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञानेश्र्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम च्या गजरात छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा निघाला पंढरपूरला.. छोटे वारकर्यांनी वारकर्यांची वेशभूषा धारण करून टाळमृदृगांच्या गजरात पालखीचे रिंगण केले. मुलींनी फुगड्यांचा आनंद लुटला डोक्यावरती तुळस खांद्यावरती पालखी व टाळकरी भक्तीने रंगून गेले.
उपस्थित पालक शिक्षकांनी या छोट्या वारकर्यांचे कौतुक केले. शेवटी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हुबेहुब विठ्ठलाची वेषभूषा केलेला विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधत होता. सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.