बारामती (वार्ताहर): बारामती तालुका बुरूड समाज संघाच्या अध्यक्षपदी संदीप बाळासाहेब पवार यांची तर उपाध्यक्षपदी संदीप गजाभाऊ साळुंके यांची एकमताने निवड करण्यात आली.
नुकतीच संघाची बैठक पार पडली. यामध्ये सन 2023 ते2028 कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष-संदीप बाळासाहेब पवार, उपाध्यक्ष/जिल्हा प्रतिनिधी-संदीप गजाभाऊ साळुंके, सचिव-निलेश दशरथ नागे, सहसचिव-संतोष भारत नागे, खजिनदार- विनोद दत्तात्रय पवार, सहखजिनदार-प्रवीण सुरेश पवार, कार्याध्यक्ष- महेश तुळशीदास घोरपडे, सदस्य-कैलास रामचंद्र पवार, करण शामराव पवार, संतोष मारुती पवार, अनिकेत तुकाराम मोरे.
आजही मूळ व्यवसाय करून बुरूड समाज आपले जीवन जगत आहे. आजही समाजातील 90टक्के लोक हेच काम करीत आहेत. दुसरा व्यवसाय करणार्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच आहे.
त्यात प्लास्टिक सूप, प्लास्टिकच्या टोपल्या आल्या आहेत. त्यात महिलांचा ओढा या वस्तूंकडे वाढला आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान भविष्यात या समाजासमोर आहे. अशा नानाविध प्रश्र्नांना सामोरे जात हा समाज आजही टिकून आहे.