बारामती(वार्ताहर): चेक न वटल्या प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री.एस.एच. अटकरी यांनी आरोपीला 1 वर्षाची शिक्षा, चेकची रक्कम व नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु 1 लाख 12 हजार 482 चा दंडाचा आदेश दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल राऊत यांनी जगदीश दराडे यांच्याकडून नवीन सलून दुकान सुरू करण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम 5 लाख 60 हजार घेतले होते. सदरची रक्कम परतफेड करणेसाठी राऊत याने दराडे याना 14 ऑगस्ट 2020 रोजीचा त्याच्या खात्याचा 5 लाख 60 हजारचा धनादेश दिला. दराडे यांनी तो चेक आपल्या खात्यात भरला असता तो वटला नाही. त्यामुळे दराडे यांनी ऍड.नितीन आटोळे मार्फत राऊत यास नोटीस पाठवली व रक्कमेची मागणी केली. सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली रक्कम दिली नाही. दराडे यांनी बारामती कोर्टात खटला दाखल केला.
याकामी फिर्यादी यांनी 3 साक्षिदार तपासले. कोर्टा पुढे आलेला पुरावा, झालेल्या साक्ष विचारत घेता मे.कोर्टाने वरीलप्रमाणे आदेश प्रारीत केला.
याकामी फिर्यादीतर्फे ऍड. नितीन आटोळे, ऍड.प्रीती शिंदे यांनी काम पाहिले, त्यांना ऍड.संतोष येडे, ऍड.अनिस शिंदे, ऍड.प्रसाद खारतुडे यांनी सहकार्य केले.