बारामती शहरात पोलिसांचा मार्च : बानपच्या परवानगीने कुर्बानी अधिकृत ठिकाणी होणार

बारामती(वार्ताहर): आषाढी एकादशी व बकरी ईद असल्याने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज बारामती शहरामध्ये बारामती शहर कडील अधिकारी व कर्मचारी यांचा रूट मार्च घेण्यात आला. बानपच्या परवानगीने कुर्बानी अधिकृत ठिकाणी होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

हिंदू-मुस्लीम संयुक्त शांतता कमिटीची सुद्धा बैठक घेण्यात आली. बकरी ईद निमित्त सार्वजनिक मटन विक्री बंद आहे परंतु नगरपालिकेच्या परवानगीने कुर्बानी अधिकृत ठिकाणी होणार आहे. कुणीही धार्मिक तेढ निर्माण होईल याप्रकारे कोणतेही कृत्य करू नये. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. गोवंश कत्तल कुठेही निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती कुणाकडे असेल तर त्यांनी प्रथम पोलिसांना कळवावी परस्पर कुणीही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करू नये. कोणत्याही प्रकारची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस पाठवले जातील. समाज माध्यमावर कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होणारी पोस्ट टाकल्यास कलम 295 153 किंवा कलम 505 प्रमाणे कारवाई करण्यात येईल याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!