इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उध्दार, बहुजनांचा शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविणारे छत्रपती शाहू महाराज याची जयंती गोतंडी ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रवी कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शाहु महाराज रयतेचे राजे होते. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी राहण्याची व शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापूरला विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह निर्माण केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी पैलवानांसाठी कुस्त्यांचा आखाडा सुरू केला. शेतकर्यांसाठी शेती उपयोगी अनेक वस्तूंचे वाटप केले. तसेच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा पुनर्विवाह चालना दिली. अशा अनेक प्रकारचे सामाजिक कामे छत्रपती शाहूजी महाराजांनी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोपट नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, सोसायटीचे माजी चेअरमन यशवंत पाटील, बिभीषण नलावडे, छगन शेंडे, आबा मारकड, अनिल खराडे, माजी सरपंच गुरुनाथ नलावडे, बाळू माने, सचिन पापत, बापूराव पिसे, कुमार नलवडे, प्रकाश मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.