नरेंद्र मोदींनी काय काय विकलं? कोणाला विकलं? कोणत्या मित्रांना विकलं? याबाबतची यादी जाहीर करू – नाना पटोले

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशाची किती संपत्ती विकली हे माहिती नसेल आम्ही ती थोड्याच दिवसात जाहीर करणार आहोत. त्यांनी काय काय विकलं? कोणाला विकलं? कोणत्या मित्रांना विकलं? याबाबतची यादी जाहीर करू असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभक्त उल्लेख केला त्यावर प्रतिक्रीया देत ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, देशातली किती संपत्ती त्यांनी (मोदी सरकार) विकली ते त्यांनी जाहीर करावे. किंवा त्याचा एखादा लेख अथवा यादी जाहीर करावी. त्यांच्याकडे यादी नसेल कारण दिल्लीत काय चाललंय हे त्यांना माहिती नसेल. मोदी सरकारविरोधात राज्यातला कोणताही नेता बोलू शकत नाही. नागपूरचे काही नेते बोलत होते, परंतु तेही आता चूप झाले आहेत. तेही बोलू शकत नाहीत. नाना पटोलेंच्या बोलण्याचा रोख केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींकडे होता असे बोलले जात आहे.

श्री.पटोले हे सातत्याने केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. हे भाजपावाले देश विकणार्‍यांना देशप्रेमी म्हणत असतील, देवेंद्र फडणवीसही त्यांना देशप्रेमी म्हणत असतील तर त्यांनी देशप्रेमीची व्याख्या काय आहे ते त्यांनी जाहीर करावे असेही ते म्हणाले. मुळात देश विकण्यासाठी, संविधान संपवण्यासाठी यांना सत्ता दिली होती का असा प्रश्न जनता विचारतेय, देश विचारतोय. कॉंग्रेस तर प्रश्न विचारणारच. परंतु आता देशातला प्रत्येक माणूस विचारतोय. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल.

पुढे पटोले म्हणाले, केंद्रातल्या सत्तेचा इतका गर्व करू नये. हे सगळं थोड्या दिवसांसाठी आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि सीबीआय त्यांच्या हातून जाईल. सत्ताही जाईल तेव्हा या सगळ्यांची काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!