माई फाऊंडेशनतर्फे वारकर्‍यांना पाणी, बिस्कीट व वेफर्स वाटप

बारामती(वार्ताहर): साधू संत येती दारा, तोचि दिवाळी दसरा याप्रमाणे माई फाऊंडेशनच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांना पाणी, बिस्कीट व वेफर्सचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड.वैभव काळे यांनी सांगितले. 2 हजार 800 बिसलरी पाणी, 2 हजार 200 पार्ले बिस्कीट तर 1 हजार 500 वेफर्सचे पुडे वाटप करण्यात आले. यावेळी माई फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!