बारामती(वार्ताहर): महाराष्ट्रात लहानांपासून ते थोरांपर्यंत, जलद खाद्यपदार्थांत मोडणारा सर्वांना हवा हवासा वाटणारा वडापाव संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झालेल्या वारकर्यांनी गरम वडापावचा अस्वाद घेतला.

कै.वस्ताद बाजीराव काळे दहिहंडी संघातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी गरम-गरम वडापाव या खाद्यपदार्थाला वारकर्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल 3 हजार 500 वडापावाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी काळेनगर येथे दोन दिंड्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात येते. महिला वारकर्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.