बारामती(वार्ताहर): शाळेच्या पहिल्या दिवशी बडबडगीत, बालगीते लावून मुलांना बैलगाडी सैर करून अत्यंत प्रसन्न व उत्साही जल्लोषपूर्ण वातावरणात भारतीय संस्कृती जपत म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत करण्यात आले.
दि.15 जून 2023 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून छान फुलांच्या पायघड्या रांगोळ्या तसेच विविध चित्रमय फलक आणि सुंदर वर्ग सजावट करून मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
सर्व पालकांसाठी शाळेतील पहिले पाऊल एक आनंददायी अनुभव!! या माध्यमातून पॅनेल बोर्ड वॉल शुभेच्छा संदेश भिंत तयार करण्यात आली होती. त्यावर पालकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा संदेश, आशीर्वाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून लावण्यात आल्या.
शाळा, सर्व वर्ग,सुंदर रित्या सजविल्यामुळे सर्व मुले व पालक भारावून गेले होते. मुले वर्गात येताना प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, अंक यांचे चित्र पाहत छान आपापल्या वर्गात हसत हसत प्रवेश करत होती. पालकांनाही खूप छान वाटत होते. सर्व मुलांना चेंडू तसेच खाऊचे वाटप करून छान एखाद्या सणाप्रमाणे शाळेचा पहिला दिवस साजरा केला गेला. या सर्व कार्यक्रमास शाळेच्या सर्व मा.पदाधिकार्यांचे बहुमोल मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.