बारामती(वार्ताहर): सध्या गावागावात विविध संतांच्या पालख्यांचे आगमनामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिकतेचे दर्शन घडावे, यासाठी बारामतीत सुद्धा जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चिमुकल्यांनी वारकर्याची वेशभुषा परिधान केले होते. विहान साजन लालबिगे व आर्वी आतिष लालबिगे या दोघा बहिण-भाऊंनी परिधान केलेल्या वेशभूषा सर्व वारकर्यांचे लक्ष वेधत होते. ज्ञानेश्र्वर व मुक्ता जसे बहिण भाऊ होते त्याचप्रमाणे विहान व आर्वी बहिण भाऊ आहेत.