बारामती(वार्ताहर): येथील रोहित दिलीप शिंदे याने 25 दुचाकीस्वारांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. रोहित आपल्या क्षमता आणि मेहनतीच्या जोरावर शर्यतीत सर्वत्र विजयाचा झेंडा फडकवत आहे.
इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपची दुसरी फेरी कर्नाटकातील चिकमंगळूर येथे 27 आणि 28 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. रोहितला ट्रॉफीच्या किंमतीसह 17 हजार बक्षीस रक्कम मिळाली.
MRF Mogrip फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (FMSCI) नॅशनल रॅली चॅम्पियनशिप ज्यामध्ये देशभरातील मोटर स्पोर्ट्समधील सर्वोत्तम आणि अनुभवी चालकांनी भाग घेतला. भारताच्या कानाकोपर्यातून आलेल्या 124 रायडर्सनी आपला उत्साह दाखवला.

मात्र या रॅलीच्या गट ब क्लास 5 सुपर स्पोर्ट 400 सीसी मध्येही बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी पहिला क्रमांक पटकावला. रॅली रेस ची माहिती 60 किलोमीटर रेस 53 किलोमीटर ट्रान्सपोर्ट करून 1तास 2 मिनिटं 4 सेकंदाचा रोहितचा ओव्हर ऑल टाईम आहे. या आधीही झालेल्या 20 आणि 21 मे 2023 रॅली ऑफ कुर्ग, कर्नाटक येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने आपली क्षमता सिद्ध करून दुसरा क्रमांक पटकावला.
यापूर्वी रोहितने तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले होते. चालू मोटरसायकलवर सूर्यनमस्कार घालणारा जगातील पहिला व्यक्ती आहे याची नोंद इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्या नावावर त्यांनी केले आहे.
रोहितला बाइक रेसिंग खूप आवडतात. बाईक रॅलीच्या या थरारक खेळात त्यांना खूप नाव कमवायचे आहे. त्यामुळेच सकाळ संध्याकाळ त्याचा दुचाकी शर्यतीचा सराव सुरू असतो. रोहित शिंदे राष्ट्रीय स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण भारतातील सर्वोत्तम बाइक रायडर्समध्ये आपले नाव नोंदविण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे.