बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी बसविण्यात येणारा विद्युत रोहित्र इतरत्र ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालया समोरील विद्युत रोहित्रामुळे 8 वर्षाच्या आदित्य चौगुलेला विजेचा धक्का बसला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची दखल घेत आरपीआयने संबंधित कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.
स्टेडियम लगत आमराई भागातील प्रबुद्धनगर, वडकेनगरची दाट लोकवस्तीची झोपडपट्टी आहे. या परिसरात लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. नव्याने उभारण्यात येणार्या ट्रान्सफार्मरमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील ट्रान्सफॉर्मर हा अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशा स्वरूपाचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सदरचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे यांच्या वतीने संबंधित विभागांना देण्यात आले.
यावेळी बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, शहर युवकाध्यक्ष मयूर मोरे, तसेच मोईन बागवान, मोहम्मद शेख इ. उपस्थित होते.