बारामती(वार्ताहर): इथं पालखी येऊन गेली का? असा सर्वसामान्यांना प्रश्र्न पडेल अशी स्वच्छता पालखी आगमनानंतर एका तासात व प्रस्थानानंतर अवघ्या तीन तासातच बारामती शहरासह मोतीबाग विसाव्यापर्यंत चकाचक झाली. बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांच्या सुचनेप्रमाणे आरोग्य विभाग व एन.डी.के. कंपनीच्या कर्मचारी यांच्याकडुन बारामती चकाचक करण्यात आली. यामध्ये तीस टनापेक्षा जास्त कचरा साफ करण्यात आला. घंटागाडी, ट्रॅक्टर इ. वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात आला.
