संतराज महाराज पालखीचे बारामतीत स्वागत

बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे श्री क्षेत्र संगम वाळकी (ता.दौंड) येथील संतराज महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत श्रावणगल्ली तरूण मंडळ, मराठानगरच्या वतीने मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले.

पालखी आगमनानंतर बा.न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.

यावेळी विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, मा.नगरसेवक शाम इंगळे, अमजद बागवान, बांधकाम व्यावसायिक मनोज पोतेकर, बारामती बँकेचे मा.उपाध्यक्ष अविनाश लगड इ. मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी पालखी गावच्या वेशीवर येण्यापूर्वी बर्‍हाणपूर याठिकाणी मा.नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक जयसिंग वामनराव पवार यांच्यावतीने पालखीची फुलाने सजावट केली जाते. वारकर्‍यांना चहा, नाष्ट्याची सोय केली जाते. यावर्षी वारकर्‍यांची तहान व थकवा दूर करणारे इलेक्ट्रो पावडर असलेले स्वच्छ पाणी देण्यात आले.

संतराज महाराज पालखी सोहळ्याचे 56 वे वर्ष असुन मंडळ स्वागत करीत असलेले 53 वे वर्ष आहे. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे यांनी मंडळाचे आभार मानले. श्रावणगल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

श्रावणगल्ली तरूण मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व नारळ देवून स्वागत करण्यात आले. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेषत: महिला वर्गाने तन-मनाने काम केले. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!