इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): मे.कोर्टाचा जैसे-थे चा आदेश असताना सुद्धा वाद क्षेत्रातील डाळींब व आंब्याची झाडे श्रीकृष्ण देवराज ढुके व यशोदा श्रीकृष्ण ढुके यांनी बेकायदेशीरपणे काढल्याने याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येडे कुटुंबिय सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा संतोष बापू येडे यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मौजे न्हावी (ता.इंदापूर) येथील गट नं.63 मधील क्षेत्र बापु महिपती येडे यांच्या नावावर आहे. सदर क्षेत्राबाबत वाद इंदापूर न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने न्यायालयाने येडे व ढुके यांना जैसे-थे चे आदेश दिलेले आहेत.
मे.कोर्टाचे आदेश असताना श्रीकृष्ण ढुके व यशोदा श्रीकृष्ण ढुके (दोघे रा.अगोती नं.3, ता.इंदापूर, जि.पुणे ) यांनी वाद क्षेत्रात जावून 200 डाळिंब झाडे व 5 आंब्याची झाडे रविवार 4 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व झाडे उपटून टाकलेली आहेत. ढुके यांनी कायदा व सुव्यवस्थेने पालन न करता बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करून मे.कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे. सदर इसमांवर फौजदारी स्वरूपाची व झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठी जंक्शन पोलीस स्टेशनला अर्ज केलेला असताना, यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे संतोष येडे यांनी सांगितले.
कायदा न जुमानणार्या व मे.कोर्टाचा अवमान करणार्यावर पोलीसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या कारणावरून गट नं.63 मध्ये येडे कुटुंब सामुहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा संतोष बापू येडे यांनी दिला आहे.