भिगवण(अशोक कांबळे यांजकडून…): हवा, पाणी, जमीन, वायू यांना आपल्या पूर्वजांनी देवते समान मानून त्याचे महत्त्व जाणले होते अशा मूलभूत घटकांच्या संरक्षणासाठी सदैव जागरूक राहिले पाहिजे असे मत बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे युनिट हेड नागेंद्र भट यांनी व्यक्त केले.
बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी (भिगवण)च्या वतीने जागतीक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी (ता. 6) मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच काव्यात्मक स्लोगन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी श्री.भट बोलत होते.
या बक्षीस वितरण सोहळ्यास बिल्ट ग्राफिक कंपनीचे बाळासाहेब सोनवणे, आनंद कमोजी (मनुष्यबळ प्रशासन विभाग प्रमुख), धरणेंद्र गांधी (इंजिनइरिंग प्रमुख), आण्णासाहेब जाधव (पॉवर प्लांट विभाग प्रमुख), अजित दुबे, श्री सुजित म्हेत्रे (इलेक्ट्रिकल व यांत्रिकी विभाग), श्री पाथरकर (गुणवत्ता नियंत्रण विभाग), जसविंदरसिंह मुंजाळ (अकाउंट विभाग प्रमुख), चौगुला (पेपर उत्पादन विभाग) याप्रमुखांसह दोनशेहून अधिक कर्मचारी उपस्थित होते.
कंपनीच्या विज वापरा विषयी सांगताना श्री.भट पुढे म्हणाले कंपनीचा वीज वापर गेल्या दोन वर्षात 28 मेगावॅट वरून 26 मेगावॅट पर्यंत कमी झाल्याचे सांगितले.
याप्रसंगी श्री. बाळासाहेब सोनवणे, डी पी गांधी, श्री जाधव आदींनी पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपले मत व्यक्त केले. यावेळी पर्यावरण विभाग प्रमुख बी.बी.पाटील यांनी पर्यावरण अहवाल सादर करताना त्यांच्या विभागाने पर्यावरण संरक्षणा साठी कोणकोणती कामे केली याचा गोषवारा सादर केला. तसेच कंपनीच्या आवारात अडीचशेहून अधिक वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगितले. सदर बक्षीस सोहळा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रास्तविक श्री. भिडे यांनी केले.