मा. विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यस्था मुंबई व पुणे शहर आयुक्तांच्या आदेशाचे तंतोतंत पालन
पुणे(वार्ताहर): मेफेड्रोन(एम.डी.) व बंटा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता आलेल्या परप्रांतीय तरुणास लोणीकाळभोर परिसरातुन चार चाकी वाहनासह अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडुन अटक केली.
सदर इसमाकडून 26 लाख 30 हजार 200 रुपये किंमतीचा ग्रॅम 101 मिलीग्रॅम मेफेड्रोन(एम.डी.) व 610 ग्रॅम वंटा व इतर ऐवज असा एकुण 36 लाख 46 हजार 200 रूपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात यश आले.
वरिष्ठांचे आदेश व सुचना नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ यांना त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकारी व स्टाफ लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना एक परप्रांतीय इसम हा मेफेड्रोन (एम.डी.) व बंटा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता पुणे-उरळीकांचन रोडने प्रयागधाम ट्रस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल बसस्टॉप शेजारी सार्वजनिक रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली असता अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील अधिकारी व स्टाप यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता त्या ठिकाणी इसम नामे जितेंद्र सतीशकुमार दुआ (वय-4, रा.ड्रिम्स निवारा सोसायटी, फ्लॅट नं.4 उरुळी कांचन पुणे. मूळ रा. WZ8B मुखर्जी पार्क, तिलकनगर वेस्ट दिल्ली, राज्य दिल्ली) हा एका चार चाकी गाडीजवळ संशयीतरीत्या उभा असल्याचे मिळुन आल्याने त्याची व त्याचे ताब्यातील चार चाकी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये कि.रु.36 लाख 46 हजार 200 रूपयांचा ऐवज त्यामध्ये ग्रॅम 20 670 मिलीग्रॅम पांढरे क्रिस्टल स्वरुपातील मेफेड्रोन(एम.डी.) हा अंमली पदार्थ रूपये 4 लाख 13 हजार 400, 80 ग्रॅम 340 मिलीग्रॅम ब्राऊन क्रिस्टल स्वरुपातील मेफेड्रोन(एम.डी.) हा अंमली पदार्थ 16 लाख 6 हजार 800 तसेच 610 मिलीग्रॅम बंटा हा अंमली पदार्थ रूपये 6 लाख 10 हजार तसेच रोख रक्कम 4 हजार, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटा रुपये 2 हजार व 3 मोबाईल फोन रूपये 10 हजार, एक फोर व्हिलर गाडी क्र.एमएच-04, जीई 8120 रूपये 10 लाख असा ऐवज हा वरील एम.डी. व बंटा 10 लाख ऐवज हा वरील एम.डी. व बंटा हा अंमली पदार्थासह अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, गुन्हे सहा.पोलीस आयुक्त सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, विशाल शिंदे, सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, रेहाना शेख यांनी केली आहे.