बारामती (वार्ताहर): येथील वेगवान गोलंदाज मोईन बागवान व फिरकी गोलंदाज स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी स्वराज वाबळे याची महाराष्ट्र अंडर 25 संघासाठी तसेच मोईन बागवान यांची महाराष्ट्र अंडर 23 संघासाठी निवड झाली होती. महाराष्ट्रातून खेळाडूमध्ये यांची निवड झाली आहे. आयपीएल नंतरची टी-20 मध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असा नावलौकिक मान या स्पर्धेस मिळाला आहे. हे दोघे बारामतीतील धीरज जाधव क्रिकेट अकादमीचे खेळाडू आहेत.