बारामती (वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर शाळेतील इ.10वी परीक्षेत कु.मृणाल महेश तांबे हिने 93.20 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. शाळेने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी 100 टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
नुकताच एस.एस.सी. विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक कु.मृणाल महेश तांबे (93.20 टक्के), द्वितीय कु.रिया किरण व्होरा (92.20 टक्के), तृतीय दर्शन लालासाहेब शेळके (91.20 टक्के) अशा तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्याप्रतिष्ठान संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.