भारतीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी विनोद गोलांडे

बारामती(वार्ताहर): भारतीय पत्रकार संघ (Aअखग) बारामती तालुका अध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक मुर्टी (ता.बारामती) येथे काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली 4 जून रोजी पार पडली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- विनोद गोलांडे, उपाध्यक्ष-शंतनु साळवे, सचिव-सुशिलकुमार अडागळे, सहसचिव- दत्तात्रय जाधव, कार्याध्यक्ष-माधव झगडे, संघटक- महंमद शेख, हल्ला कृती समिती: निखिल नाटकर, कोषाध्यक्ष- सोमनाथ जाधव, पदवीधर सल्लागार-संभाजी काकडे, प्रसिद्धी प्रमुख-अविनाश बनसोडे, कायदेशीर सल्लागार ऍड.गणेश आळंदीकर, संघ प्रेस फोटोग्राफर जितेंद्र काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

भारतीय पत्रकार संघ हा दर महिन्यातील मासिक बैठकीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. मावळते अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!