बारामती: येथील नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ, बारामतीच्या अध्यक्षपदी डॉ.विजय भिसे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार संघ, बारामतीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.2 जून 2023 रोजी सायं. 4.30 वा. ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती याठिकाणी सुधीर जन्नु यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणास संपन्न झाली.
सन 2023-26 ची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. अध्यक्ष- डॉ.विजयकुमार रामचंद्र भिसे, उपाध्यक्ष-नवनाथ धनाजी बोरकर, शिवाजीराव ताटे, कार्याध्यक्ष- सौ.शुभांगी दत्तात्रय महाडिक, सचिवपदी फेरनिवड तैनुर शफिर शेख, सहसचिव- स्वप्निल शिंदे, खजिनदार-सोमनाथ बाबुराव कवडे, सहखजिनदार-दीपक दिगंबर पडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेची सुरूवात सचिव तैनुर शेख यांनी विषय वाचून केली. याप्रसंगी अमोल तोरणे, स्वप्निल शिंदे, सोमनाथ कवडे, वसंत मोरे, दत्तात्रय महाडिक, सुधीर जन्नु यांनी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष सुधीर जन्नु यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी मन्सूर शेख, राजेश वाघ उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगिलते की, पत्रकार ही एक जात म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अन्यायग्रस्त पत्रकारासाठी लोकशाही पद्धतीने निवेदन, आंदोलन केले जाईल. सहा महिन्यात एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. पत्रकार संघातर्फे विधायक उपक्रमाबरोबर आर्थिक ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. पत्रकार कार्यालय, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व नोंदणीकृत पत्रकारांची यादी प्रत्येक शासकीय कार्यालयात माहितीसाठी देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी आभार दत्तात्रय महाडिक यांनी मानले.