बारामती(वार्ताहर): शास्त्रीय तबला वादनात प्रणिल अविनाश भापकर याने केंद्रीय शिष्यवृत्ती पुरस्कार पटकवीला आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत सांस्कृतीक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कुल (सीबीएसई) मध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणिल अविनाश भापकर ने शास्त्रीय तबला वादनात केंद्रीय शिष्यवृत्ती पुरस्कार पटकवीला आहे.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी लहान गटातून महाराष्ट्रातील केवळ पाच विध्यार्यांची निवड झाली असून त्यात प्रणिल ने स्थान प्राप्त केले आहे.
वयाच्या आठव्या वर्षांपासून प्रणिल तबला वादन करत असून सध्या पुणे येथील प्रसिद्ध तबला वादक श्री पराग हिरवे गुरुजी यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. प्रणिलने यापूर्वी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तीन परीक्षेमध्ये तबला वादनात यश संपादन केले आहे.
सामाजिक सांस्कृतीक शैक्षणीक तसेच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या यशाबद्दल प्रणिलचे अभिनंदन केले आहे.